१०८ रुग्णवाहिकेने ४६९३ काेराेना संबधित रुग्णांना पाेहचविले रुग्णालयात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:28 PM2020-11-29T17:28:10+5:302020-11-29T17:28:27+5:30
संशयीत रुग्णांना कोव्हीड १९ केअर सेंटरवर सोडणे व निगेटिव्ह रुग्णांना घरी सोडणे हे कार्य केले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र शासन व भारत विकास ग्रा.पं. यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे जिल्हयातील १०८ रुग्णवाहिकेने ४६९३ काेराेना संबधित रुग्णांना रुग्णालयात पाेहचविण्याचे कार्य मे पासून तर २० नाेव्हेंबरपर्यंत केले.
जिल्ह्यात १०८ क्रमांकच्या एकूण ११ रुग्नवाहिका रुग्णसेवेत असून कोरोना रुग्नवाहिका चालकांनी महामारीच्या काळात तत्परतेने कर्तव्य पार पाडल्यामुळे १०८ क्रमांकची रुग्नवाहिका जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरली असून हजारो कोरोना बाधीतांना रुग्णालयात पोहचून त्यांना जीवनदान देण्याचे काम या रुग्णवाहिकेने केले आहे.
१०८ ह्या रुग्णवाहिकेने १५ मे २०२० पासून ते २० नोव्हेंबर २०२० पर्यंत एकुण ४६९३ कोरोना संबंधी रुग्णांना रुग्णालयात पोहचविले, तर संशयीत रुग्णांना कोव्हीड १९ केअर सेंटरवर सोडणे व निगेटिव्ह रुग्णांना घरी सोडणे हे कार्य केले आहे.
याशिवाय मागील आक्टोबर महिन्यामध्ये कोरोना रुग्णा व्यक्तिरिक्त १०८ या रुग्णावाहिकेने तब्बल ११७३ रुग्णांना सेवा दिली असून यामध्ये अपघात, मारहान, जळालेले, विष प्राशन केलेले, प्रस्तुती सेवा हृदयरोग तसेच इत्यादी अत्यावश्यक बाबीच्या रुग्णांना सेवा देवून त्यांचे प्राण वाचविण्याचे कार्य केले.