वाशिम जिल्ह्यात १०९ टक्के वृक्ष लागवड

By admin | Published: July 7, 2017 01:49 PM2017-07-07T13:49:20+5:302017-07-07T13:50:57+5:30

जिल्ह्यात ७ जुलैच्या सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ४ लाख ६६ हजार ९१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

10.9% plantation of trees in Washim district | वाशिम जिल्ह्यात १०९ टक्के वृक्ष लागवड

वाशिम जिल्ह्यात १०९ टक्के वृक्ष लागवड

Next

इतर विभागांची कामगिरीही उत्कृष्ट: विविध संघटनांचाही सहभाग

वाशिम: शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत सामाजिक वनीकरणसह वनविभागाशी निगडित कार्यालयांना ७ जुलैपर्यंत १ लाख ८९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असताना त्यांच्याकडून ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण २ लाख ६ हजार ७५० वृक्षांची लागवड केली. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या १०९.३० टक्के आहे. सामाजिक वनीकरण व वनविभागसोडून इतर विभागांनीही त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ८१.४३ टक्के वृक्ष लागवड केली आहे. जिल्ह्यात ७ जुलैच्या सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ४ लाख ६६ हजार ९१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.  शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला जिल्ह्यातील विविध शासकीय विभागासह शाळा, महाविद्यालये, सामाजिक , स्वयंसेवी संस्थांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शासनाच्या मोहिमेत सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या विविध शाखांसाठी १ लाख ८९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यांच्याकडून या वृक्ष लागवडीसाठी विविध स्थळांची निवड करून २ लाख २७ हजार ८१० खड्डे खोदण्यात आले आणि त्यापैकी २ लाख ६ हजार ७५० खड्ड्यांत ७ जुलै २०१७ च्या सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २ लाख ६ हजार ७५० वृक्ष लावण्यात आले. हे प्रमाण निर्धातिर वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या १०९.३९ टक्के आहे. सामाजिक वनीकरणसह वनविभागाच्या विविध शाखासोडून जिलहाधिकारी वाशिम यांनी जिल्ह्यातील इतर विभागांसाठी ३ लाख १८ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यासाठी ३ लाख ५१ हजार १८९ खड्डे खोदण्यात आले. यातील २ लाख ५९ हजार ३४१ खड्ड्यांत वृक्ष लावण्यात आले. हे प्रमाण जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वृक्ष लागवड उद्दिष्टाच्या ८१.४३ टक्के आहे. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेतंतर्गत ८ जुलै रोजी वनविभागाकडून अद्ययावत होणाऱ्या आकडेवारीत हे प्रमाण निश्चित शंभर टक्क्यांच्यावर असेल, असा विश्वास अधिकारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

Web Title: 10.9% plantation of trees in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.