पावसाळयातही ११ दिवसाआड पाणी
By admin | Published: July 1, 2016 01:14 AM2016-07-01T01:14:48+5:302016-07-01T01:14:48+5:30
वाशिम येथे नगरसेवकांसह सामाजिक संघटनेनी सुरु केलेले टँकर झाले बंद.
वाशिम : वाशिम शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या एकबुर्जी प्रकल्पात मृत पाणी साठा असल्याने नागरिकांना ११ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांकडे पाहिजे त्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता नसल्याने अनेक समस्यांच्या सामोरे जावे लागत आहे. ३0 जून रोजी शहरात बर्यापैकी पाऊस झाल्याने पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. वाशिम शहरात एप्रिल महिन्यापासूनच पाणी टंचाई जाणविण्यास प्रारंभ झाला. पाणी टंचाई दिवसेंदिवस उग्ररुप धारण करीत असल्याने शहरातील काही नगरसेवक, समाजसेवकांनी मोफत टँकरव्दारे पाण्ी पुरवठा सुरु केला. जून महिन्याच्या दुसर्या आठवडयापर्यंत शहराला यांच्यातर्फे पाणी देण्यात आल्ो. त्यानंतर अनेकांनी टँकरबंद केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाशिम नगरपरिषदेच्यावतिने सुरुवातीला दररोज २४ तास पाणी पुरवठा केला. जसजसे पाण्याची पातळी खालावत गेली तशीतशी पाणी देण्याच्या दिवसामध्ये वाढ करण्यात आली. सुरुवातीला दररोज नंतर दोन दिवसाआड त्यानंतर तीन दिवसाआड, पाण्ीा पुरवठा करण्यात आला. पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असल्याने सहा दिवसाआड तर आता अकरा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात नगरपरिषद पाणी विभागाशी संपर्क साधला असता २९ व ३0 जून रोजी झालेल्या पावसाने पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे जसजशी पाणी पातळीत वाढ होईल तसतसे पाणी पुरवठा करण्याचे दिवस कमी होतील. सद्या काही भागात ८ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एकबुर्जी प्रकल्पात पाणी साठा निर्माण झाल्यावर दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल. सद्यास्थितीत शहरातील अनेक भागात अकरा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना मात्र पावसाळयातही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.