आणखी ११ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:26+5:302021-07-21T04:27:26+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...

11 more corona-free; 4 Positive! | आणखी ११ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह!

आणखी ११ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह!

Next

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी नव्याने ४ रुग्ण आढळून आले, तर ११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम व रिसोड तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित चार तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६२० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०९३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात मृत्यूसत्राला ब्रेक मिळाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.

--------------------------

चार तालुके निरंक

मंगळवारच्या अहवालानुसार कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यातील सुपखेला येथे एक, तर रिसोड तालुक्यातील भोकरखेड, मोहजाबंदी व शेलू खडसे येथे प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळून आला. वाशिम शहरात सलग तिसऱ्या दिवशीही रुग्ण आढळून आला नसल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला.

--------------------------६१ सक्रिय रुग्ण

मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने ४ रुग्ण आढळून आले, तर ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे ६१ रुग्ण सक्रिय आहेत.

Web Title: 11 more corona-free; 4 Positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.