‘फिट इंडिया फ्रिडम रन’ अंतर्गत धावले ११ राष्ट्रीय खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 04:18 PM2020-08-30T16:18:16+5:302020-08-30T16:18:23+5:30
राष्ट्रीय स्तरावर खेळणारे ११ आणि राज्यस्तरावर खेळणार ६ खेळाडू पहिल्याच दिवशी सहभागी झाले.
- नंदलाल पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्यावर जिल्हा क्रीडा दिनाच्या औचित्यावर २९ आॅगस्ट ते २ आॅक्टोबरपर्यंत फिट इंडिया रन हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात आट्या पाट्या क्रीडा प्रकारातील दोन शिवछत्रतपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू मिळून राष्ट्रीय स्तरावर खेळणारे ११ आणि राज्यस्तरावर खेळणार ६ खेळाडू पहिल्याच दिवशी सहभागी झाले. या खेळाडंूनी २९ आॅगस्ट रोजीच रनिंग करून सहभाग नोंदविला.
दरवर्षी राज्यात व देशात २९ आॅगस्ट हा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमिा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो; परंतु यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुभार्व असल्याने क्रीडा स्पर्धांवर मर्यादा आल्या आहेत. तथापि, कोणतीही व्यक्ती स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवून कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव करू शकते आणि हे विविध क्रीडा प्रकार आणि योगामुळे शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊनच क्रीडा विभागाने फिट इंडिया मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीनेही ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ हा एक नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जय गजानन महाराज क्रीडा मंडळाच्यावतीने रनिंग हा क्रीडा प्रकार करून मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार यांना अभिवादन केले. यात ११ राष्ट्रीय आणि ६ राज्यस्तरीय खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यात दोन शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचाही समावेश होता. तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते, ही बाब लक्षात घेऊन, तसेच समाजातील इतर लोकांना या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने युवा व खेळ मंत्रालयाच्या ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ या उपक्रमात जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचे सदस्य सहभागी होत असल्याची माहिती शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू सागर गुल्हाने याने दिली.