वाशिम जिल्ह्यात ११ कलमी कार्यक्रमाची चोख अंमलबजावणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:44 PM2018-06-16T15:44:09+5:302018-06-16T15:44:09+5:30
वाशिम: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न वाढावे आणि गावे समृद्ध व्हावीत, यासाठी शासनातर्फे ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविली जात आहे.
वाशिम: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न वाढावे आणि गावे समृद्ध व्हावीत, यासाठी शासनातर्फे ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविली जात आहे. या माध्यमातून विविध स्वरूपातील ११ कामे मोहिम स्वरुपात घेऊन राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याची वाशिम जिल्ह्यात चोखपणे अंमलबजावणी सुरू असून कल्पवृक्ष लागवडीकडे विशेष लक्ष पुरविले जात असल्याची माहिती रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी दिली.
११ कलमी कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ कामे प्राधान्याने राबविण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने सिंचन विहिरी, शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, ग्रामभवन, गावांतर्गत रस्ते, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, समृद्ध गाव तलाव व इतर जलसंधारणाची कामे, वृक्ष लागवड व संगोपन आणि ग्राम सबलीकरणाच्या समृद्ध ग्राम योजनांचा समावेश आहे. त्यानुसार, जिल्ह्यात नमूद सर्वच कामे सुरू असून वृक्षलागवडीकडे सद्या विशेष लक्ष पुरविले जात असल्याचे कोरडे यांनी सांगितले.