वाशिम जिल्ह्यात सिकलसेलचे ११0 रुग्ण

By admin | Published: December 18, 2014 01:12 AM2014-12-18T01:12:32+5:302014-12-18T01:12:32+5:30

२0११ पासून २ लाख ६८ हजार ५९७ रुग्णांची तपासणी; ११३५ नागरिकांमध्ये आढळली सिकलसेलची लक्षणे.

110 cases of sickle cell in Washim district | वाशिम जिल्ह्यात सिकलसेलचे ११0 रुग्ण

वाशिम जिल्ह्यात सिकलसेलचे ११0 रुग्ण

Next

नंदकिशोर नारे / वाशिम

जिल्हय़ात सुरू असलेल्या सिकलसेल सप्ताहादरम्यान जिल्हय़ातील अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्हय़ात २0११ पासून नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंंत २ लाख ६८ हजार ५९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११३५ जणांमध्ये सिकलसेलची लक्षणे, तर ११0 जणांना सिकलसेल झाल्याचे आढळून आले. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमामध्ये व नियमित तपासणीमध्ये सिकलसेलची लक्षणे आढळून आलीत. त्यामध्ये वाशिम तालुक्यात १११ जणांचा समावेश आहे. त्यापैकी १ रुग्ण सिकलसेलचा आढळून आला. तसेच रिसोड तालुक्यामध्ये ४0 सिकलसेलची लक्षणे असलेले, तर ३ सिकलसेलचा आजार असलेले रुग्ण आढळून आले. याचप्रमाणे मानोर्‍यामध्ये २७९, मंगरूळपीरमध्ये १९९, मालेगावमध्ये ५९ तर कारंजामध्ये ३0७ सिकलसेलची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आले. यापैकी मानोर्‍यामध्ये १२, मंगरूळपीर ११, कारंजा २९ तर मालेगावमध्ये ६ रुग्ण सिकलसेलचे आढळून आले. जिल्हय़ात सिकलसेल सप्ताह ११ ते १७ डिसेंबरला घेण्यात आला. या दरम्यान सफरर कॅम्पमध्ये ४0 रुग्णांनी लाभ घेतला.

Web Title: 110 cases of sickle cell in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.