कोरोना : दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 06:47 PM2021-06-09T18:47:37+5:302021-06-09T18:47:42+5:30

Corona Cases in Washim : दुसऱ्या लाटेतील चारच महिन्यांत हा आकडा ११ हजारांवर पोहोचला.

11,000 women infected with corona in second wave | कोरोना : दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग!

कोरोना : दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग!

Next


वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तुलनेने अधिक तीव्र स्वरूपाची ठरली. त्यात प्रशासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांसह घरातच अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या महिलाही संसर्गाच्या शिकार झाल्या. विशेषत: कोरोनाच्या ११ महिन्यांच्या पहिल्या लाटेत २८१७ महिला बाधित झाल्या होत्या. दुसऱ्या लाटेतील चारच महिन्यांत हा आकडा ११ हजारांवर पोहोचला. त्यातील शंभरापेक्षा अधिक महिलांचा संसर्गाने मृत्यूदेखील झाला.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेचा कालावधी एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ हा गृहीत धरला जात असून त्यानंतर संसर्गाची दुसरी लाट आल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पहिल्या लाटेत जिल्ह्यातील एकूण ७ हजार ४३० जण बाधित झाले होते. त्यात महिला बाधितांची संख्या केवळ २ हजार ८१७ होती; तर दुसऱ्या लाटेत एकूण ३३ हजार ३१३ जण बाधित झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली असून महिला बाधितांचा आकडा ११ हजारांपेक्षा अधिक झालेला आहे.

 

७,४३०
पहिल्या लाटेत एकूण बाधित
२,८७०
महिला बाधितांची संख्या
३३,३१३
दुसऱ्या लाटेत एकूण बाधित
११,१२२
महिला बाधितांची संख्या
 
 

Web Title: 11,000 women infected with corona in second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.