दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:35+5:302021-06-10T04:27:35+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेचा कालावधी एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ हा गृहीत धरला जात असून त्यानंतर संसर्गाची दुसरी ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेचा कालावधी एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ हा गृहीत धरला जात असून त्यानंतर संसर्गाची दुसरी लाट आल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पहिल्या लाटेत जिल्ह्यातील एकूण ७ हजार ४३० जण बाधित झाले होते. त्यात महिला बाधितांची संख्या केवळ २ हजार ८१७ होती; तर दुसऱ्या लाटेत एकूण ३३ हजार ३१३ जण बाधित झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली असून महिला बाधितांचा आकडा ११ हजारांपेक्षा अधिक झालेला आहे.
.....................
७,४३०
पहिल्या लाटेत एकूण बाधित
२,८७०
महिला बाधितांची संख्या
३३,३१३
दुसऱ्या लाटेत एकूण बाधित
११,१२२
महिला बाधितांची संख्या
................
मार्चनंतर वाढला महिला लसीकरणाचा टक्का
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जिल्हाभरात बाधित होणाऱ्या महिलांची संख्या जेमतेम २८७० एवढीच राहिली. त्यामुळे १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेस महिलांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मार्च महिन्यानंतर मात्र ४५ वर्षांपेक्षा अधिक महिलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढायला लागले. ९ जूनअखेर ९५ हजार ५९ महिलांचे लसीकरण झाले आहे.