१.१३ कोटी विद्यार्थ्यांना शाळा प्रारंभाला मोफत पाठ्यपुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 09:35 PM2018-05-19T21:35:02+5:302018-05-19T21:35:02+5:30

शिक्षण सचिवांचे आदेश : ३५२ कोटी मंजूर, १ ते ८ वी मधील विद्यार्थ्यांना लाभ

1.13 crore students get free textbooks at school | १.१३ कोटी विद्यार्थ्यांना शाळा प्रारंभाला मोफत पाठ्यपुस्तके

१.१३ कोटी विद्यार्थ्यांना शाळा प्रारंभाला मोफत पाठ्यपुस्तके

Next

इंदल चव्हाण/अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभालाच इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या १ कोटी १३ लाख ४९ हजार ६४९ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी ३५२ कोटी २५ लाखांच्या तरतुदीस शासनाने मान्यता दिली आहे. याविषयीचे निर्देश गुरूवारी शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

येत्या शैक्षणिक सत्रात प्राथमिकस्तरावर प्रतिविद्यार्थी २५० रूपये व माध्यमिक स्तर प्रतिविद्यार्थी ४०० रूपये या दराने ही तरतूद तत्त्वत: मंजूर करण्यात आलेली आहे. येत्या सत्रासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगू व सिंधी अरेबी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे यापूर्वीच नोंदविण्यात आलेली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांद्वारा पुस्तकांची खरेदी करण्याची शक्यता लक्षात घेता सर्व व पालक व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी शाळेच्या दर्शनी भागावर याविषयीचे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावर पुस्तके आल्यानंतर तत्काळ माध्यम, इयत्ता व  विषयनिहाय संच वर्गीकरण करावेत व विनाविलंब संबंधित शाळांना पाठविण्यात यावेत. पुस्तके तालुकास्तरावर आल्यावर गटसमन्वयकाचा प्रभार असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाºयांनी कार्यालय सोडू नये, अशी तंबी शिक्षण सचिवांनी दिली आहे.

पुस्तके वाटपाची विभागनिहाय तारीख
विदर्भातील शाळांमध्ये २६ जून व उर्वरित महाराष्ट्रात १५ जून २०१८ रोजी पाठ्यपस्तके वाटण्याचे निर्देश आहेत. या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप मुख्याध्यापक करतील. या समारंभाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ व संस्थेच्या पदाधिका-यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. पहिल्या दिवशी जे विद्यार्थी येतील त्यांना व जे अनुपस्थित आहेत, त्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर पुस्तके वितरित करावे व निकषपात्र शाळांमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्यास शिल्लक राहिलेल्या पाठ्यपुस्तकांमधून वितरित करण्यात येणार आहेत.

Web Title: 1.13 crore students get free textbooks at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.