११५० कोटींचे पीककर्ज वाटप होणार !

By admin | Published: April 9, 2017 08:03 PM2017-04-09T20:03:55+5:302017-04-09T20:03:55+5:30

वाशिम- यावर्षी सर्व बँका मिळून एकूण ११५० कोटी रुपयांचे पीककर्ज एकूण दीड लाख शेतकऱ्यांना वितरित करण्याचे नियोजन केले आहे.

1150 crore crop loans will be allotted! | ११५० कोटींचे पीककर्ज वाटप होणार !

११५० कोटींचे पीककर्ज वाटप होणार !

Next

वाशिम : खरिप पीककर्ज वाटपाला सुरूवात झाली असून, यावर्षी सर्व  बँका मिळून एकूण ११५० कोटी रुपयांचे पीककर्ज एकूण दीड लाख शेतकऱ्यांना वितरित करण्याचे नियोजन केले आहे. 
२०१६ या वर्षात निसर्गाने साथ दिली; मात्र शेतमालाचे बाजारभाव गडगडले. हमीभावापेक्षाही कमी भावात शेतमालाची विक्री शेतकऱ्यांना करावी लागली. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीककर्जरुपी कुबड्याच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. एप्रिल महिन्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपाला सुरूवात केली नाही. ७ एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीककर्ज वितरणाला सुरूवात केली. यावर्षी दीड लाख शेतकऱ्यांना ११५० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले जाणार आहे. ३१ मे २०१७ पर्यंत सर्व बँकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले आहेत.ंतील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त; गाव पुनर्वसनांचा प्रश्न निकाली !

 

Web Title: 1150 crore crop loans will be allotted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.