अमरावती विभागातील ११७ कायम विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी पात्र
By admin | Published: June 19, 2015 02:28 AM2015-06-19T02:28:01+5:302015-06-19T02:28:01+5:30
३५१ वर्ग, ५८१ शिक्षक व ४९२ शिक्षकेतर कर्मचारी २0 टक्के अनुदानासाठी पात्र.
अकोला- अमरावती विभागातील ११७ शाळांमधील कायम विनाअनुदानित हा शब्द वगळल्यानंतर या शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३५१ वर्ग, ५८१ शिक्षक व ४९२ शिक्षकेतर कर्मचार्यांना २0 टक्के अनुदानास पात्र ठरविण्याचा आदेश गुरुवारी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिला. राज्यात २00१ नंतर शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिली जात होती. २४ नोव्हेंबर २00१ च्या आदेशानुसार राज्यात २ हजार माध्यमिक व २ हजार प्राथमिक शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात आली होती. या शाळांना अनुदान लागू करण्याची मागणी सातत्याने होत होती. शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी यासाठी आंदोलनेही केली होती. त्यानुसार काँग्रेस आघाडी सरकारने कायम विनाअनुदानित शाळांमधील ह्यकायमह्ण शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. २0१२-१३ पासून मूल्यांकनाचे सुधारित निकष जाहीर करून या शाळांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्राप्त प्रस्तावांची छाननी करून अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे अकोला जिल्हा दौर्यावर असताना त्यांनी अमरावती विभागातील ११७ शाळांना अनुदानास पात्र ठरविण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यांचे घोषणेनुसार गुरुवारी शालेय शिक्षण विभागाने अनुदानास पात्र ठरलेल्या ११७ शाळांची यादी जाहीर केली आहे. पाचही जिलतील ११७ शाळांमधील ३५१ वर्गांना मान्यता देण्यात आली आहे. या शाळांसाठी ५८१ मुख्याध्यापक व प्रशिक्षित शिक्षकांना अनुदानास पात्र ठरविण्यात आले आहे. याशिवाय ४९२ शिक्षकेतर कर्मचार्यांचाही त्यात समावेश आहे. या शाळा २0१३-१४ पासून २0 टक्के अनुदानास पात्र ठरल्या आहेत.