मेहा येथे एकाच दिवशी १२ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:15+5:302021-02-27T04:55:15+5:30
-------------- अंबोड्यात ग्रामपंचायतची जनजागृती धनज बु.: परिसरात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती सुरू केली ...
--------------
अंबोड्यात ग्रामपंचायतची जनजागृती
धनज बु.: परिसरात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती सुरू केली आहे. त्यात परिसरातील अंबोडा येथे ग्रामपंचायतने गुरुवारी गावात फेरी काढत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
--------------
रिक्त पदांमुळे तपासणीत अडचणी
धनज बु.: परिसरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचणी वेगात करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत; परंतु आरोग्य विभागाची पदे रिक्त असल्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात अडचणी येत आहेत.
--------------
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी
धनज बु.: येथून जवळच असलेल्या भिवरी येथे गुरुवारी ४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान होताच आरोग्य विभागाने बाधितांच्या संपर्कातील २५ पेक्षा अधिक व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून घेतली.
===========
चेकपोस्टवर ४० वाहनांची तपासणी
धनज बु.: अमरावती जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत तहसीलदारांनी दोनद बु. येथे जिल्हा सीमेवर चेकपोस्ट सुरू केली आहे. या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी सुरू असून, गुरुवारी ४० वाहनांची तपासणी पोलिसांनी केली.