आसेगाव बांधात १२ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:40 AM2021-03-10T04:40:58+5:302021-03-10T04:40:58+5:30

---------------- दोन सापांना जीवदान वाशिम : निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी मंगळवारी सकाळी मानोरा आणि मंगरुळपीर येथे आढळलेल्या दोन ...

12% stock in Asegaon dam | आसेगाव बांधात १२ टक्के साठा

आसेगाव बांधात १२ टक्के साठा

Next

----------------

दोन सापांना जीवदान

वाशिम : निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी मंगळवारी सकाळी मानोरा आणि मंगरुळपीर येथे आढळलेल्या दोन बिनविषारी सापांना पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

----------------

३९ व्यावसायिकांची कोरोना चाचणी

वाशिम : शहरात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आरोग्य विभागाने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींसह व्यावसायिकांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. त्यात सोमवारी शहरातील ३९ व्यावसायिकांची चाचणी झाली.

----------------

अनुदानित बियाणे वितरणासाठी उपलब्ध

वाशिम : खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले असून, कृषी विभागाच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांना वेळेत बियाणे वितरित करण्यासाठी महाबीजने जिल्ह्यात अनुदानित बियाणे उपलब्ध केले आहेत.

----------------

सिंचन विहिरींसाठी प्रस्तावांचे आवाहन

वाशिम : लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. वाशिम तालुक्यात आठवडाभरात केवळ ११० प्रस्ताव आले असून, ग्रामपंचायतींनी प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांनी सोमवारी केले.

----------------

शासकीय केंद्रांवर शुकशुकाट

वाशिम : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तथापि, बाजारात चांगले दर मिळत असल्याने नोंदणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही. त्यामुळे मंगळवारी शासकीय खरेदी केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

-----------------

पीकविम्यासाठी कृषी विभागाला निवेदन

वाशिम : गत हंगामात अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. तालुक्यातील अशा १२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे शुक्रवारी निवेदन सादर करून दखल घेण्याची मागणी केली.

Web Title: 12% stock in Asegaon dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.