१२ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली!
By admin | Published: July 1, 2016 01:13 AM2016-07-01T01:13:56+5:302016-07-01T01:13:56+5:30
रिसोड येथे पहिल्या टप्प्यात १२ अनधिकृत धार्मिक स्थळ हटविली.
रिसोड (जि. वाशिम): पहिल्या टप्यामध्ये शहरातील १२ अनाधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्णत्वास गेली असून उर्वरित तीन स्थळे हटविण्याची कारवाई पोलिसांचा आवश्यक ताफा मिळाल्यानंतर होईल, असे कळविण्यात आले आहे. उच्चन्यायालयाच्या आदेशानुसार, रिसोड नगर परिषदेने पहिल्या टप्यामध्ये एका दिवसात १२ अनधिकृत धार्मिक स्थळ हटविली आहेत यामध्ये प्रथम जिजाऊ नगरमधील माँ काली मंदिर, अवलीयाबाबा दर्गा, गौसपूरा येथील दर्गा, महात्मा फुले नगरमधील सैलानी बाबा दर्गा, पाचपिर दर्गा, मारोती मंदिर, अमरदास नगरमधील मारोती मंदिर, गौसपार्क दर्गा, अष्टभुजा चौकमधील मारोती मंदिर नगर परिषदेनजिकची मरिआई, सैलानी दर्गा व दुय्यम निबंधक कार्यालयानजिक कालूशहॉ बाबा दर्गा या अनधिकृत धार्मिक स्थळांचा समावेश आहे. उर्वरित तीन स्थळे येत्या दोन दिवसांत हटविण्यात येणार आहेत. त्यात अग्रवाल भवनजवळील नंदिकेश्वर मंदिर व आठवडे बाजारमधील खंडू महाराज मंदिर यांचा समावेश आहे. दरम्यान, आठवडे बाजारमधील मारोती मंदिर अधिकृत असल्याचा पुरावा सिद्ध झाला. त्यामुळे सदर मंदिर हटविण्यात आले नाही, अशी माहिती नगर परिषदेतील सूत्रांनी दिली.