१२ वर्षांपासून भाविकांना मोफत प्रवाससेवा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:54 AM2017-08-23T00:54:17+5:302017-08-23T00:54:39+5:30

किन्हीराजा : पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी करेच्या दिवशी काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थानवर दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना गेल्या १२ वर्षांपासून मोफत प्रवास सेवा देण्याचा उपक्रम येथील ११ ऑटोचालक करीत आहेत. यंदाही या ऑटोचालकांनी हा उपक्रम राबवून सेवाभावी उद्देशाची प्रचिती दिली. 

For 12 years, free travel service for devotees! | १२ वर्षांपासून भाविकांना मोफत प्रवाससेवा! 

१२ वर्षांपासून भाविकांना मोफत प्रवाससेवा! 

Next
ठळक मुद्देकिन्हीराजा येथील परंपरा११ ऑटोचालकांचा सेवाभावी उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हीराजा : पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी करेच्या दिवशी काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थानवर दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना गेल्या १२ वर्षांपासून मोफत प्रवास सेवा देण्याचा उपक्रम येथील ११ ऑटोचालक करीत आहेत. यंदाही या ऑटोचालकांनी हा उपक्रम राबवून सेवाभावी उद्देशाची प्रचिती दिली. 
पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी करीदिनाला  परिसरातील शेकडो भाविक काळामाथा येथे अवलीया महाराज संस्थान अवलिया महाराज समाधी स्थळी दर्शन घेण्यासाठी जातात. या o्रद्धाळू भाविकांना  किन्हीराजा ते काळामाथा या अंतरावर मोफत प्रवास सेवा देण्याचा संकल्प १२ वर्षांपूर्वी किन्हीराजा येथील गजानन राठोड यांनी केला होता त्यांच्या या उपक्रमाला परिसरातील इतर ऑटधारकांचा प्रतिसाद लाभला आणि दरवर्षी आटो चालकांची भाविकांना मोफत सेवा देण्याची इच्छा वाढत गेली. अनेक अँटोचालकांनी यात सहभाग नोंदविला. यंदाही मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी गजानन राठोड, अरविंद राठोड, सुनील डाखोरे, संजय जाधव, अरुण राठोड, रोहिदास राठोड, भीमराव राठोड, संजय राठोड, रुपेश डाखोरे, महादेवराव सानप, भारत कांबळे या ११ ऑटोचालकांनी  दिवसभर अवलिया महाराजांच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना मोफत प्रवास सेवा पुरविली. हजारो भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन  काळामाथा येथे पोहोचत अवलिया महाराजांच्या चरणी माथा टेकला. काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थान हे अनेक भाविकांचे o्रद्धास्थान असून, या ठिकाणी दर्शनासाठी हजारो भाविक ये-जा करतात पोळय़ाच्या दिवशी करीदिनाला मोफत सेवा o्रद्धाळू भाविकांना देऊन समाजाप्रती आपले दायित्व पार पाडणे, हाच आमचा उद्देश असल्याचे या ऑटोचालकांकडून सांगण्यात येते. 

Web Title: For 12 years, free travel service for devotees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.