वाशिम जिल्ह्यातील चार पशु दवाखान्यांसाठी १.२० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 04:04 PM2018-11-09T16:04:53+5:302018-11-09T16:05:37+5:30

वाशिम : जिल्ह्यातील चार पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे, मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरूस्ती करणे आदीसाठी १.२० कोटींच्या निधीची तरतूद असल्याने लवकरच या दवाखान्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.

1.20 crores fund for four veterinary dispensaries in Washim district | वाशिम जिल्ह्यातील चार पशु दवाखान्यांसाठी १.२० कोटींचा निधी

वाशिम जिल्ह्यातील चार पशु दवाखान्यांसाठी १.२० कोटींचा निधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील चार पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे, मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरूस्ती करणे आदीसाठी १.२० कोटींच्या निधीची तरतूद असल्याने लवकरच या दवाखान्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशूवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. काही पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरवस्था झाली आहे. कारखेडा, काटा, मुरंबी, तोंडगाव येथील पशुदवाखान्याची इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारत बांधकामाची मागणी पुढे आली. याची दखल घेत या इमारत बांधकामासाठी निधीची मागणी शासनस्तरावर नोंदविली होती. सन २०१७-१८ या वर्षात मुरंबी व तोंडगाव येथील पशुदवाखान्यासाठी प्रत्येकी ३० लाख असा एकूण ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. सन २०१८-१९ या वर्षात कारखेडा व काटा येथील पशुदवाखान्यासाठी प्रत्येकी ३० लाख असा एकूण ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. आवश्यक ते प्रशासकीय व तांत्रिक सोपस्कार पार पडल्यानंतर बांधकामाला सुरूवात होणार आहे. 
बॉक्स..
पशुवैद्यकीय दवाखान्यात भौतिक सुविधा उपलब्ध करणे, नवीन इमारत बांधकाम यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. चार पशुदवाखान्यांसाठी प्रत्येकी ३० लाखांचा निधी मंजूर असून, लवकरच बांधकामाला सुरूवात होईल.
- विश्वनाथ सानप
सभापती, कृषी व पशुसंवर्धन
जिल्हा परिषद वाशिम

Web Title: 1.20 crores fund for four veterinary dispensaries in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.