जिल्ह्यात ‘सीइआयआर’ पाेर्टलव्दारे चाेरी, हरविलेले १२० माेबाईल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:24+5:302021-07-03T04:25:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हा पाेलीस विभागाच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच गहाळ माेबाईलच्या जलदगतीने शाेधाकरिता सीइआयआर हे ऑनलाईन पाेर्टल ...

120 stolen mobiles seized in district through 'CEIR' portal | जिल्ह्यात ‘सीइआयआर’ पाेर्टलव्दारे चाेरी, हरविलेले १२० माेबाईल हस्तगत

जिल्ह्यात ‘सीइआयआर’ पाेर्टलव्दारे चाेरी, हरविलेले १२० माेबाईल हस्तगत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्हा पाेलीस विभागाच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच गहाळ माेबाईलच्या जलदगतीने शाेधाकरिता सीइआयआर हे ऑनलाईन पाेर्टल डिसेंबर २०२० पासून कार्यान्वित करुन माहे जून २०२१ मध्ये १२० माेबाईल हस्तगत करण्यात पाेलीस विभागाला यश आले. तर २०२० मध्ये गहाळ, चाेरी झालेले एकूण २५० माेबाईल नागरिकांना परत करण्यात आले.

सर्वत्र माेबाईल चाेरीच्या घटनेत माेठ्या प्रमाणात वाढ दिसून येते. जिल्ह्यातही हजाराे माेबाईलची चाेरी, गहाळ झाल्याच्या घटना घडल्यात. ज्या नागरिकांनी माेबाईल चाेरी, गहाळ झाल्याची तक्रार पाेलीस विभागामध्ये नाेेंदविली त्यांचे माेबाईल शाेधण्यास पाेलिसांना यश आले आहे. सीइआयआर या पाेर्टलव्दारे माेबाईल चाेराचा शाेध लवकर लागत असल्याने पाेलीस विभागाने याचा अवलंब करुन माेठ्या प्रमाणात माेबाईल शाेधण्यात यश मिळविले आहे. माेबाईल चाेरी करणाऱ्या अनेकांवर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. २०२० मध्ये १८ लाखाचे गहाळ, चाेरी झालेले एकूण २५० माेबाईल संबंधितांना परत करण्यात आले आहेत. माेबाईल चाेरी गेल्यास अथवा गहाळ झाल्यास माेबाईल मालकांनी सीइआयआर पाेर्टलवर किंवा नजिकच्या पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यास सायबर विभागाकडून त्याचा शाेध ताबडताेब लागू शकताे. याकरिता नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. अनेकजण माेबाईल गहाळ, चाेरी झाल्यानंतर तक्रार देण्यास टाळाटाळ करतात.

............

सीइआयआर पाेर्टल कसे काम करते

या पाेर्टलमध्ये सर्व माेबाईल हॅन्डसेटची माहिती संकलित करण्यात आली आहे. माेाबाईल फाेनला आयएमइआय नंबर असतात याची सर्व माहिती दूरसंचार विभाग आपल्याकडे ठेवताे. यामुळे चाेरी झालेला माेबाईल सहजपणे ट्रेस हाेऊ शकताे. यासाठी या पाेर्टलवर तक्रार करणे आवश्यक आहे. तक्रार करण्यासाठी दूरसंचार विभागाने १४४२२ हेल्पलाईन नंबर सुध्दा दिला आहे. जेव्हा पाेर्टलवर तक्रार येईल तेव्हा पाेलीस विभागाकडून त्याचा शाेध घेतला जाताे. तसेच माेबाईल चाेरी झाल्याची ऑनलाईन तक्रार करण्यापूर्वी जवळच्या पाेलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करता येऊ शकते.

............

या पाेर्टलचे फायदे

चाेरी झालेल्या माेबाईलला सहजपणे ट्रेस करता येऊ शकते. माेबाईल ब्लाॅक करता येऊ शकताे

महत्वाची माहिती चाेराच्या हातात पडण्यापूर्वी ती राेखू शकताे.

...........

माेबाईलमधील आवश्यक महत्त्वाचा डाटा कुणाच्या हाती लागू नये याकरिता माेबाईल गहाळ, चाेरी, हरविल्यास त्याची तक्रार केल्यास माेठा अनर्थ हाेण्यापासून बचाव हाेऊ शकताे. जिल्हा पाेलीस विभागाने महाराष्ट्रात सर्वप्रथम सीइआयआर पाेर्टलचा वापर सुरु केला आहे. या पाेर्टलमुळे सहज माेबाईल चाेरांचा शाेध लागून माेबाईल परत मिळण्यास मदत हाेते. याकरिता नागरिकांनी हेल्पलाईन नंबर किंवा नजिकच्या पाेलीस स्टेशनशी संपर्क करणे आवश्यक आहे.

- वसंत परदेशी

पाेलीस अधीक्षक, वाशिम

Web Title: 120 stolen mobiles seized in district through 'CEIR' portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.