सरासरीपेक्षा १२२ मि.मी. जास्त पाऊस!
By admin | Published: October 3, 2016 03:00 AM2016-10-03T03:00:05+5:302016-10-03T03:00:05+5:30
वाशिम जिल्ह्यात तब्बल ९२१.५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वाशिम, दि. 0२- १ जून ते १ ऑक्टोबर २0१६ दरम्यान जिल्ह्यात सरासरी ७९८.७0 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. यंदा मात्र पावसाने अक्षरश: कहर केला असून, १ ऑक्टोबरपर्यंत तब्बल ९२१.५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १२२.८२ मिलीमीटरने अधिक आहे.
२ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कारंजा तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक १४0.२१ टक्के पावसाची नोंद झाली असून, त्यापाठोपाठ मानोरा तालुक्यात १२0.१२, रिसोड तालुक्यात ११७.९, वाशिम तालुक्यात ११३.३६, मालेगाव तालुक्यात १0३.२३, तर मंगरूळपीर तालुक्यात १00.६२ टक्के पाऊस कोसळल्याची नोंद घेण्यात आली आहे.
अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे नदी-नाले ह्यओव्हर फ्लोह्ण झाले असून विहिरी, हातपंप, कूपनलिका आदी जलस्रोतही ओसंडून वाहत आहेत.
तथापि, आगामी रब्बी हंगामात या पाण्याचा फायदा होणार असून, शेतमालाच्या उत्पादनात कमालीची वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.