वाशिम जिल्ह्यात सिकलसेलचे १२३ रुग्ण

By admin | Published: June 19, 2015 02:57 AM2015-06-19T02:57:50+5:302015-06-19T02:57:50+5:30

जागतिक सिकलसेल दिन; १२१७ नागरिकांमध्ये आढळली सिकलसेलची लक्षणे.

123 patients of Sickle cell in Washim district | वाशिम जिल्ह्यात सिकलसेलचे १२३ रुग्ण

वाशिम जिल्ह्यात सिकलसेलचे १२३ रुग्ण

Next

वाशिम : जिल्हय़ात सिकलसेल सप्ताह व डे केअर सेंटरद्वारे जिल्हय़ातील अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्हय़ात २0११ पासून नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत २ लाख ६९ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२१७ जणांमध्ये सिकलसेलची लक्षणे तर १२३ जणांना सिकलसेल आजार झाल्याचे आढळून आले. सिकलसेल आजार हा शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन गोल असणार्‍या लाल रक्तपेशी विळय़ाच्या आकाराच्या होतात. सामान्य माणसाच्या रक्तपेशी १२0 दिवसपर्यंत जिवंत राहतात; परंतु सिकलसेल रोगग्रस्तांच्या ३0 ते ४0 दिवस पेशी जिवंत असतात हा आजार आनुवंशिक आहे . दरवर्षी जिल्हय़ात सिकलसेल सप्ताह राबविला जातो. या सप्ताह तपासणीत व सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमामध्ये व नियमित तपासणीमध्ये सिकलसेलची ही लक्षणे आढळून आलीत. त्यामध्ये वाशिम तालुक्यात १७२ जणांचा समावेश आहे त्यापैकी १ रुग्ण सिकलसेलचा आढळून आला. तसेच रिसोड तालुक्यामध्ये ५0 सिकलसेलची लक्षणे असलेला तर ३ सिकलसेलचा आजार असलेले रुग्ण आढळून आले. याचप्रमाणे मानोर्‍यामध्ये २८४, मंगरूळपीरमध्ये २0४, मालेगावमध्ये ५९ तर कारंजामध्ये ३0७ सिकलसेलची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आले. यापैकी मानोर्‍यामध्ये १२, मंगरूळपीर ११, कारंजा २९ तर मालेगावमध्ये ६ रुग्ण सिकलसेलचे आढळून आले होते. जिल्हय़ात आजच्या घडीला १२३ सिकलसेल रुग्ण असून, त्यांच्यावर नियमित उपचार करण्यात येत आहेत. तसेच सिकलसेलची लक्षणे आढळलेल्या १२१७ नागरिकांवरही उपचार करण्यात येत आहेत.

Web Title: 123 patients of Sickle cell in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.