उंबर्डा बाजार आरोग्य केंद्रांतर्गत १२५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:38 AM2021-02-14T04:38:43+5:302021-02-14T04:38:43+5:30
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. किरण जाधव यांच्या मार्गदर्शनात उंबर्डा बाजार आरोग्य केंद्राचे ...
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. किरण जाधव यांच्या मार्गदर्शनात उंबर्डा बाजार आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. आर. नांदे यांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे अवघ्या दहा महिन्यातच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उद्दिष्ट पूर्ण झाले. उंबर्डा बाजार आरोग्य केंद्राला १ एप्रिल ते ३१ मार्च २०२१ साठी १२५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. कोरोनाच्या काळात संपूर्ण खबरदारी घेऊन वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच उंबर्डा बाजार आरोग्यवर्धिनी केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराला सुरुवात करण्यात आली होती .
दर आठवड्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने ५ फेब्रुवारी २०२१ रोजीच निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. शस्त्रक्रिया पार पाडण्याकरिता डाॅ. अरविंद भगत (शेलूबाजार), डाॅ. चंद्रशेखर भोंगाडे (पोहरादेवी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर आरोग्य केंद्राचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रामकृष्ण वानखडे, ढवक, सविता बुरडे, माला पवार, निशा दाभणे, छाया देशकरी, रवी धागंड, रवी बागडे आदींनी अथक परिश्रम घेतले. गरजू लाभार्थ्यांसाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे शिबिर सुरूच राहणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. आर. नांदे यांनी सांगितले.