आठ दिवसात १२८ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:34+5:302021-07-14T04:46:34+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने एप्रिल २०२० या महिन्यात शिरकाव केला. मेडशी (ता.मालेगाव) येथे संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला ...
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने एप्रिल २०२० या महिन्यात शिरकाव केला. मेडशी (ता.मालेगाव) येथे संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होतो. तेव्हापासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत सात हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधित निष्पन्न झाले. त्यानंतर आलेली संसर्गाची दुसरी लाट तीव्र स्वरूपाची ठरली. या लाटेत ३५ हजारांवर नवे रुग्ण बाधित आढळले. गेल्या काही दिवसांत मात्र ही लाटही झपाट्याने ओसरत चालल्याचे दिसून येत आहे.
५ ते १२ जुलै या आठ दिवसांत जिल्ह्यात आठ हजारांपेक्षा अधिक लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण उणेपुरे ९९ आहे. त्यातुलनेत उपचार घेत असलेल्या १२८ जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या आशादायक आकडेवारीवरून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.
...................
गत आठ दिवसांतील स्थिती
५ जुलै - १९/२१
६ जुलै - ०९/२०
७ जुलै - ०९/१०
८ जुलै - १६/०९
९ जुलै - १५/१७
१० जुलै - १०/१३
११ जुलै - १३/२२
१२ जुलै - ०८/१६
बाधित रुग्ण /डिस्चार्ज रुग्ण
................
कोट :
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट निवळत चालले आहे. गेल्या आठ दिवसांत केवळ ९९ बाधित रुग्ण आढळले. त्या तुलनेत १२८ जणांचा डिस्चार्ज झाला. परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे; मात्र नागरिकांनी गाफील न राहता नियमांचे पालन करावे.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम