१३ जणांची कोरोनावर मात; आणखी १० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:39+5:302021-07-11T04:27:39+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. शनिवारी नव्याने १० रुग्ण आढळून आले तर १३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिसोड, मालेगाव व मानोरा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१५५५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०८०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली आहे. मालेगाव शहरात तसेच वाशिम, मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१२६ सक्रिय रुग्ण
शनिवारच्या अहवालानुसार नव्याने १० रुग्ण आढळून आले तर १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १२६ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
वाशिम तालुका निरंक
शनिवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. मालेगावच्या ग्रामीण भागात तीन रुग्ण आढळून आले. रिसोड शहरात एक तर ग्रामीण भागात एक रुग्ण, मंगरूळपीर शहरात व ग्रामीण भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.