परराज्यातून कंटेनरने आलेला १३ लाखाचा गुटखा जप्त!

By admin | Published: April 7, 2017 12:04 AM2017-04-07T00:04:04+5:302017-04-07T00:04:04+5:30

वाशिम- परराज्यामधून मधुन अवैधपणे राज्यात आणला जाणारा १३ लाखांचा गुटखा शहर पोलीस स्टेशनमधील डिटेक्शन ब्रँच पथकाच्या हाती लागला.

13 lakhs of gutka seized from container | परराज्यातून कंटेनरने आलेला १३ लाखाचा गुटखा जप्त!

परराज्यातून कंटेनरने आलेला १३ लाखाचा गुटखा जप्त!

Next

दोन दिवसांतील दुसरी मोठी कारवाई : एलसीबीनंतर शहर पोलीसांना मिळाले यश 

वाशिम :  परराज्यामधून मधुन अवैधपणे राज्यात आणला जाणारा १३ लाखांचा गुटखा शहर पोलीस स्टेशनमधील डिटेक्शन ब्रँच पथकाच्या हाती लागला. सदर गुटख्याचा शोध ५ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर  लागला. 

परराज्यामधून कंटेनरचा वापर करून त्यामधे अवैधपणे गुटख्याची वाहतूक करून राज्यामधील गुटखा किंगला पुरवठा होत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सी.ए. कदम यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधिक्षक स्वप्ना गोरे व उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे यांच्या मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जायभाये, राजेश बायस्कर, ज्ञानेश्वर म्हात्रे, सतिष गुळदे, गजानन कऱ्हाळे यांच्या पथकाने बाहेती हॉस्पिटल नजीक सापळा रचला होता. 

डी.बी. पथकाने संशयीत ट्रकला थांबवून थांबवून तपासणी करण्यासाठी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये ट्रक उभा केला. या लांबलचक कंटेनरमध्ये (अंदाजे ४० फुट लांबी) वजनदार पार्सल भरलेले होते. कंटेनरमधील सर्व माल उतरविण्यासाठी तब्बल सहा ते सात तासाचा कालावधी लागला. अखेर सर्वात शेवटच्या टप्प्यात अतिशय गुप्त पध्दतीने दडवलेल्या गुटख्याचे तब्बल ५२ पोते पोलीसांच्या हाती लागले. तत्पुर्वी उपस्थित असलेल्या अन्न औषध प्रशासन अधिकारी व मिडीयाच्या प्रतिनिधींना ट्रकमध्ये अवैध वस्तू आढळून येईल याची काहीच शास्वती नव्हती. परंतू पोलीसांनी आपले प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले असता त्यांना अखेर गुटख्याचे ह्यरॉ मटेरीयलह्ण हाती लागले. सदर घटनेची माहिती शहर पोलीसांनी अकोला येथील अन्न व औषध विभागाचे अधिकारी अजिंठेकर यांना दिली. अजिंठेकर यांनी ६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताचे सुमारास घटनास्थळाचा पंचनामा करून गुटख्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल  (अंदाजे किंमत २३ लाख) व ट्रक (अंदाजे किंमत २० लाख) रितसर जप्त केला. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत ४३ लाख आहे. ट्रकचालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

Web Title: 13 lakhs of gutka seized from container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.