१३ जणांकडून १२०० रुपये दंड वसूल

By admin | Published: June 20, 2017 01:39 PM2017-06-20T13:39:18+5:302017-06-20T13:39:18+5:30

हगणदरीमुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाºया नागरिकांना पकडले.

13 people recovered Rs 1200 fine | १३ जणांकडून १२०० रुपये दंड वसूल

१३ जणांकडून १२०० रुपये दंड वसूल

Next

वाशिम - हगणदरीमुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने २० जून रोजी वाशिम तालुक्यातील धुमका, उकळीपेन, कृष्णा परिसरात भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना पकडले. यावेळी १३ जणांना अनसिंग पोलीस स्टेशनला आणण्यात आले. १३ जणांकडून प्रत्येकी १२०० रुपये दंड रोख स्वरुपात वसूल केला.
हगणदरीमुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाने गुड मॉर्निंग पथक सक्रिय केले आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करणे, वारंवार सूचना करूनही उघड्यावर शौचास जात असल्यास त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई करणे ही धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. २० जून रोजीच्या पाहणीत उघड्यावर शौचविधी करताना  १३ जणांना पकडण्यात आले. या सर्वांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या उकळीपेन येथील महादेव बळीराम राऊत याच्याविरूद्ध भादंवी कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: 13 people recovered Rs 1200 fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.