पश्चिम वऱ्हाडातील अभयारण्यासाठी १.३१ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 02:24 PM2018-03-31T14:24:19+5:302018-03-31T14:24:19+5:30

वाशिम: राज्य शासनाने निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत विविध अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पात विकास कामे करण्यासाठी ५.६३ कोटी रुपयांचा निधी २८ मार्च रोजी मंजूर केला.

1.31 crore fund for the Wildlife sanctuary of West Varadha | पश्चिम वऱ्हाडातील अभयारण्यासाठी १.३१ कोटींचा निधी

पश्चिम वऱ्हाडातील अभयारण्यासाठी १.३१ कोटींचा निधी

Next
ठळक मुद्दे निसर्ग पर्यटन केंद्रांत विविध विकास कामे करून सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने ५ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट वन्यजीव अभयारण्यासाठी १ कोटी २१ लाख ४५७.बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यासाठी ४९ लाख ६६४, तर वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यासाठी १० लाख २६०५ रुपयांच्या निधीचा समावेश आहे.


वाशिम: राज्य शासनाने निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत विविध अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पात विकास कामे करण्यासाठी ५.६३ कोटी रुपयांचा निधी २८ मार्च रोजी मंजूर के ला असून, यामध्ये पश्चिम वऱ्हाडातील अकोट वन्यजीव अभयारण्य आणि वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यासाठी मंजूर केलेल्या १.३१ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. अटी आणि निकषाच्या अधीन राहून निसर्ग पर्यटन विकासाची कामे या निधीतून करण्यात येणार आहेत.
निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांत पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून वन्यजीव पर्यटनाकडे त्यांना आकर्षित करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. या अंतर्गत राज्यभरातील वन्यजीव अभयारण्य, पक्षी अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या निसर्ग पर्यटन केंद्रांत विविध विकास कामे करून सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने ५ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्यातील अकोट वन्यजीव अभयारण्यासाठी १ कोटी २१ लाख ४५७, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यासाठी ४९ लाख ६६४, तर वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यासाठी १० लाख २६०५ रुपयांच्या निधीचा समावेश आहे. यामुळे संबंधित अभयारण्यात निसर्ग पर्यटनाच्या विकासासाठी विविध योजना राबविणे शक्य होणार आहे. सदर निधीचा वापर अटी आणि निकषांच्या अधीन राहून करावयाचा आहे. दरम्यान, अमरावती विभागातील टिपेश्वर अभयारण्य, सीपना वन्यजीव आणि गुगामल वन्यजीव या अभयारण्यातही निसर्ग पर्यटनासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अमरावती विभागात येत्या काही वर्षांत निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Web Title: 1.31 crore fund for the Wildlife sanctuary of West Varadha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.