महाईस्कॉल पोर्टलवर शिष्यवृतीचे १३४७ अर्ज प्रलंबित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 04:11 PM2019-05-08T16:11:40+5:302019-05-08T16:12:16+5:30

वाशिम : सन २०११-१२ ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील विजा भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी (फ्रीशिप) योजनेंतर्गत महाईस्कॉल पोर्टलवर १४४ महाविद्यालयांचे १३४७ अर्ज प्रलंबित दिसून येत आहेत.

134 applications of scholarships are pending! | महाईस्कॉल पोर्टलवर शिष्यवृतीचे १३४७ अर्ज प्रलंबित !

महाईस्कॉल पोर्टलवर शिष्यवृतीचे १३४७ अर्ज प्रलंबित !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सन २०११-१२ ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील विजा भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी (फ्रीशिप) योजनेंतर्गत महाईस्कॉल पोर्टलवर १४४ महाविद्यालयांचे १३४७ अर्ज प्रलंबित दिसून येत आहेत. प्रलंबित अर्जांपैकी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यास २९ सप्टेंबर २०१८ आणि १८ जानेवारी २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक व संबंधित काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा १० मे २०१९ रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेस हजर न राहिल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा, महाविद्यालाचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची राहील, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी सांगितले.
सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षात विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी योजनेंतर्गत अर्ज निकाली काढण्यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टी. सी.), गुणपत्रक, जात प्रमाणपत्र, संबंधित शैक्षणिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास), गॅप आणि ट्रान्स्फर प्रमाणपत्र (लागू असल्यास) व अन्य कागदपत्रांची तपासणी शासन निर्णयान्वये संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक यांचेकडून करूनच पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज २५ मे २०१८ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत, अशा सूचना केदार यांनी दिल्या.

Web Title: 134 applications of scholarships are pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.