जिल्ह्यातील आठ पुलांसाठी १३.५२ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:57 AM2021-02-26T04:57:01+5:302021-02-26T04:57:01+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पहिल्या टन्प्यात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बांधकामासाठी भरीव निधी मंजूर झाला होता. त्यातून रस्त्यांची कामे पूर्ण झाली; ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पहिल्या टन्प्यात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बांधकामासाठी भरीव निधी मंजूर झाला होता. त्यातून रस्त्यांची कामे पूर्ण झाली; परंतु जोपर्यंत रस्त्यांवर पुलांची कामे होत नाहीत, तोपर्यंत विशेष फायदा होणार नव्हता. त्यानुषंगाने जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींनी मंत्रालयीन स्तरावर हा प्रश्न लावून धरला. त्याची अखेर दखल घेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या एडीबी टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यातील आठ पुलांच्या बांधकामांसाठी लागणारा १३ कोटी ५२ लाख ६२ हजारांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्ष ठाकरे यांनी दिली.
...........................
या रस्त्यांवरील पुलांची कामे लागणार मार्गी
जिल्ह्यातील वाघोली खु.-अडोळी या रस्त्यावरील पुलासाठी ७३.८१ लाख, वाघोली बु.-अडोळी ८७.७९ लाख, मुठ्ठा-शिरपूर २२०.०५ लाख, प्रजिमा १९ ते शेगी भडकुंभा-दाभडी-कुंभी-वसंतवाडी ते जिल्हा सीमेवरील पुलाकरिता २०२.१२ लाख प्रजिमा १९ ते शेगी भडकुंभा-दाभडी-कुंभी-वसंतवाडी सीमेवरील पुलाकरिता ४०५.१३ लाख, साखरडोह ते सिंगडोह रस्त्यावरील पुलासाठी २०६.९१ लाख, गिरोली ते खेर्डा रस्त्यावरील पुलाकरिता १४९.७३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुलांची ही कामे आता मार्गी लागणार आहेत.