वाशिम जिल्हयात १३७ मि.मी. पाऊस
By admin | Published: August 7, 2015 01:21 AM2015-08-07T01:21:38+5:302015-08-07T01:21:38+5:30
दुस-यादिवशीही पाऊस ; पावसाने सरासरी ओलांडली
वाशिम : जिल्हयात ३ आॅगस्ट मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस ६ आॅगस्टलाही कमी अधिक प्रमाणात सुरु आहे. ६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत १३७.२० मि.मि. पाऊस पडला. या पावसामुळे प्रकल्पाच्या पाण्यात मोठया प्रमाणात वाढ झाली असून आजपर्यंत अपेक्षित असलेला ४६२. ६३ सरासरी पाऊस ओलांडला असून ६ आॅगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत ४७८.२२ मि.मि. पाऊस पडला.
६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हयात एकूण १३७. २० मि.मि. पाऊस पडला याची सरासरी २३.८७ मि.मि. आहे. जिल्हयात ६ आॅगस्ट रोजी दिवसभर पाउस बरसला. ६ आॅगस्ट ते ७ आॅगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत वाशिम तालुकयात ३५.०० मि.मि., मालेगाव तालुक्यात २८ , मंगरुळपीर तालुक्यात २६.२० , मानोरा तालुक्यात ६ तर कारंजा तालुक्यात १३ मि.मि. असा एकूण १३७.२० मि.मि.पाऊस पडला. जिल्हयात ६ आॅगस्ट रोजी पाऊस होता.