वाशिम जिल्हयात जलसंधारणाची १३८ कामे पुर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 04:45 PM2019-05-16T16:45:03+5:302019-05-16T16:45:20+5:30
एकुण १३८ कामे पुर्ण झाली असून ४१ कामे प्रगतीपथावर असल्याची माहीती सुजलाम सुफलम अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सांमजस्य करारानुसार सुजलाम सुफलाम दुष्काळ मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत वाशिम जिल्हयातील कारंजा, मानोरा, रिसोड, मालेगाव, रिसोड, वाशिम या सहाही तालुक्यात नाला खोलकरण, सिएनबी खोलकरण, शेततळे, सिसिटी, डिपसिसिटी, शेताची बांध बदिस्ती, माती नाला बांध, गाव तलाव खोलीकरणाचे असे एकुण १३८ कामे पुर्ण झाली असून ४१ कामे प्रगतीपथावर असल्याची माहीती सुजलाम सुफलम अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी दिली.
सुजलाम सुफलाम अभियानाची कामे वाशिम जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने व जिल्हयातील जलसंपदा विभाग, कृषी विभाग, वन विभाग, लघु पाटबंधारे जि.प.विभाग, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या सहकार्यने जलसंधारणाची कामे पुर्ण होत आहे. या कामाकरीता भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेच्या तसेच ज्या गावात जलसंधारणची कामे सुरू आहेत त्या गावक-यांचे सहकार्य मिळत आहे. वाशिम जिल्हयात सहाही तालुक्यात जलसंधारणाची कामे झाली त्यामध्ये वाशिम तालुक्यात ४६ कामे पुर्ण तर १० कामे सुरू आहेत. तर मानोरा तालुक्यात १५ पुर्ण तर ५ कामे सुरू तर मंगरूळपीर तालुक्यात ८ पुर्ण तर ९ कामे सुरू तर मालेगाव तालुक्यात २० कामे पुर्ण तर ६ कामे सुरू तर कारंजा तालुक्यात २१ कामे पुर्ण तर ७ कामे सुरू तर रिसोड १३ पुर्ण असून ४ सुरू आहेत.
जिल्हयात ट्रक्चरनिहाय झालेली नालाखोलीकरण ६६ सिएनबी नाला खोेलीकरण ३५, शेततळे १३ सिसिटी ५,डिप सिसिटी १७, शेताची बांध बदिस्ती २७, माती नाला बांध २, गाव तलावातील गाळ काढणे १४ ही कामे झालेली असून पाउस येईपर्यंत जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात होणार असल्याची माहीती सुजलाम सुफलाम अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी दिली.
(प्रतिनिधी)