१४९५ जागांसाठी ४८९९ उमेदवारी अर्ज
By admin | Published: July 21, 2015 12:53 AM2015-07-21T00:53:35+5:302015-07-21T00:53:35+5:30
वाशिम जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी ; १६३ ग्रामपंचायतींची होणार निवडणूक.
वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या १४९५ जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ४८९९ हजार उमेदवारी अर्ज प्राप्त झालेत. वाशिम तालुक्यात २३ ग्रामपंचायतींमध्ये २३१ सदस्य, मालेगाव तालुक्यात ३0 ग्रामपंचायतींमध्ये २७६ सदस्य , मंगरुळपीर तालुक्यात २५ ग्रामपंचायतींमध्ये २0९, रिसोड तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये ३३४ सदस्य, कारंजा तालुक्यात २८ ग्रामपंचायतींमध्ये २११ सदस्य, मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमध्ये २३४ सदस्य अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींमध्ये १४९५ सदस्य निवडूून द्यावयाचे आहे. ग्रामीण भागातील अतिशय महत्त्वाच्या व अटीतटीच्या होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी, २0 जुलैला जिल्ह्यातील तहसील कार्यालयावर मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वाशिम तालुक्यातून ३९७, रिसोड ६५0, मालेगाव ६१६, मंगरुळपीर २८३, कारंजा ५५४ व मानोरा तालुक्यातून ३१५ असे एकूण ४८९९ अर्ज प्राप्त झालेत. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतसाठी होत असलेल्या निवडणुकीकरिता तालुकानिहाय शेवटच्या दिवसापर्यंत एकूण प्राप्त अर्जामध्ये वाशिम तालुक्यातून ७५३, रिसोड १0८६, मालेगाव ९६८, मंगरुळपीर ७८२, कारंजा ६७९ व मानोरा तालुक्यातून ६३१ असे एकूण 000 अर्ज प्राप्त झालेत. २१ जुलै रोजी अर्जाची छाननी होणार आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतीसाठी इच्छूक उमेदवारांचे १९८0 नामांकन अर्ज दाखल झाले होते. १८ जुलैचा रमजान दिन आणि १९ जुलैचा रविवार यामुळे या दोन्ही दिवशी इच्छुकांना अर्ज दाखल करता आले नाहीत त्यामळे शेवटच्या दिवशी २0 जुलैला जिल्हयातील तहसील कार्यालयावर मोठय़ा प्रमाणात अर्ज भरणार्यांची गर्दी दिसून आली. जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणुकांसाठी ह्यऑनलाइनह्ण उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेदरम्यान शहरासह ग्रामीण भागात ह्यइंटरनेट कनेक्टिव्हिटीह्ण नसल्यामुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक दिसून आली. ऑनलाइनचा गोंधळ पाहता, राज्य निवडणूक आयोगाने अर्ज स्वीकारण्याला दीड तासांची मुदतवाढ दिली तसेच पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबात सूचित केले. तसेच मालेगाव तालुक्यातील वसारी, तिवळी यांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत अविरोध होण्याची शक्यता असली तरी अद्याप याबाबत घोषणा करण्यात आली नाही.