वाशिम जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना मिळाले नवे कारभारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:31 PM2021-02-18T12:31:41+5:302021-02-18T12:31:53+5:30
Gram Panchayat Election तिसऱ्या टप्प्यात १७ फेब्रुवारी रोजी १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.
वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर, तिसऱ्या टप्प्यात १७ फेब्रुवारी रोजी १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. १४ ग्रामपंचायतींना नवे कारभारी मिळाले आहेत.
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान निवडणूक झाली. सरपंच, उपसरपंच पदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत निवडणूक घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात १७ फेब्रुवारी रोजी मालेगाव तालुक्यातील १० आणि मानोरा तालुक्यातील चार अशा एकूण १४ ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणूक झाली.
मालेगाव : : तालुक्यातील १० ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांची निवड आज करण्यात आली.
जऊळका सरपंचपदी सुवर्णा रमेश लांडगे, उपसरपंचपदी गजानन सखाराम तोडकर, खिडा येथे सरपंचपदी रेखा दत्ता लठड, उपसरपंच विद्या शेषराव शिंदे, मुंगळामध्ये सरपंच शुभांगी प्रवीण वायकर, उपसरपंच नंदकिशोर प्रभाकर वनस्कर, पांगरी कुटे सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले असून उपसरपंचपदी भाग्यश्री सतिष कुटे यांची निवड झाली. वसारी येथील सरपंचपदही रिक्त आहे; तर उपसरपंचपदी लक्ष्मण हरिभाऊ जाधव यांची निवड झाली. तिवळी सरपंचपदी गजानन बन्सी इंगळे, उपसरपंच मालती भानुदास बकाल, जोडगव्हाण सरपंचपदी रणजीत एकनाथ जाधव, उपसरपंचपदी सुमित्रा संदीप कांबळे, राजुरा सरपंच पद रिक्त, उपसरपंचपदी यशोदा लक्ष्मण लावणे, शिरसाळा सरपंच पद रिक्त, उपसरपंचपदी रामकोर आत्माराम इंगोले आणि वाकळवाडी सरपंचपदी जिजा श्रीकृष्ण चापे; तर उपसरपंचपदी विजया राजू व्यवहारे यांची निवड झाली.