एचआयव्ही बाधित १४ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:46 AM2021-01-13T05:46:27+5:302021-01-13T05:46:27+5:30

एडस निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एडस नियंत्रण कक्षाद्वारे जिल्ह्यातील सहाही तालुक्यात महिला, पुरुषांची तपासणी केली जाते. या अंतर्गत २०१७-१८ ते ...

14 HIV-infected women give birth to negative babies | एचआयव्ही बाधित १४ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म

एचआयव्ही बाधित १४ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म

Next

एडस निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एडस नियंत्रण कक्षाद्वारे जिल्ह्यातील सहाही तालुक्यात महिला, पुरुषांची तपासणी केली जाते. या अंतर्गत २०१७-१८ ते २०-२१ या चार वर्षांच्या काळात सन ६०९८६ पुरुषांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २९२ पुरुष एचआयव्ही बाधित आढळले. त्याशिवाय ४८३२५ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२१ महिला ंबाधित आढळल्या. यासोबतच एडस नियंत्रण कक्षाद्वारे या चार वर्षांच्या काळात ८३ हजार ४७ महिलांची तपाणी करण्यात आली. त्यापैकी १५ महिला एचआयव्हीबाधित आढळल्या. या महिलांवर एडस नियंत्रण कक्षात नियमित उपचार करण्यात आल्याने त्यापैकी १४ महिलांनी एचआयव्ही निगेटिव्ह बाळाला जन्म दिला, तर एका महिलेच्या पोटी आलेले बाळ मात्र एचआयव्ही बाधित आढळले.

---------

चार वर्षांत २२१ महिला आढळल्या बाधित

जिल्हा एडस नियंत्रण कक्षाच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात तपासणी करण्यात आलेल्या एकूण ४८३२५ महिलांपैकी केवळ २२१ महिला एचआयव्हीबाधित आढळल्या. त्यात १५ गरोदर महिलांचाही समावेश होता. एडस नियंत्रण कक्षाकडून करण्यात येणारे योग्य मार्गदर्शन आणि वेळेवरील उपचारामुळे या महिलांची प्रकृती उत्तम असून, त्या स्वस्थ जीवन जगत आहेत.

---------

कोट: जिल्हा एडस नियंत्रण कक्षाच्या मार्गदर्शनात पथकाने व्यापक जनजागृती करून गरोदर महिलांची तपासणी केली. त्यात बाधित आढळलेल्या १५ महिलांवर नियमित उपचार करण्यात आले. त्यामुळे या १५ पैकी १४ महिलांनी जन्म दिलेले बाळ एचआयव्ही निगेटिव्ह आढळून आले असून, त्या सर्वांची प्रकृती उत्तम आहे.

- भिसे,

जिल्हा समन्वयक, एडस नियंत्रण कक्ष

------------

गरोदर महिलांनी ही काळजी घ्यावी !

एचआयव्ही बाधित असलेल्या गरोदर महिलांनी ठरवून दिलेल्या तारखेला जिल्हा किंवा तालुका एडस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आवश्यक औषधे घ्यावीत. औषधांचे नियमित सेवन करून नियमित एडस नियंत्रण कक्षात तपासणी करून घ्यावी, जेणेकरून त्यांचे आरोग्य अबाधित राखणे शक्य होईल.

----------

तालुका निहाय तपासणी आणि बाधितांचे प्रमाण

वाशिम ७३०८

रिसोड ३००२

मंपीर २०२४

मानोरा २१६६

कारंजा लाड २७५१

मालेगाव ९२०

--------------

Web Title: 14 HIV-infected women give birth to negative babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.