१४ मोबाइल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:38 AM2021-04-19T04:38:33+5:302021-04-19T04:38:33+5:30
शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम नंधाना येथील आकाश चिलवंत हा युवक खासगी फायनान्स कंपनीत काम करतो. कंपनीमार्फत तो ग्राहकांना ...
शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम नंधाना येथील आकाश चिलवंत हा युवक खासगी फायनान्स कंपनीत काम करतो. कंपनीमार्फत तो ग्राहकांना मोबाईलची डिलिव्हरी करीत असतो. ग्राहकांना डिलिव्हरी देण्यासाठी त्याने नवीन मोबाईल घरी आणून ठेवले होते. दरम्यान १७ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून एक लाख रुपयांहून अधिक किंमत असलेले १४ नवीन मोबाईल चोरून नेले. नंधाना येथे तीन महिन्यांआड अशा घटना घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ बोरकर यांनी सांगितले. त्यांच्या घरीसुद्धा चोरीचा प्रयत्न झाला. आकाश शीलवंत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरपूर पोलिसांनी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले हे करीत आहेत. घटनास्थळावर श्वानपथक व फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र चोरट्याचा सुगावा लागू शकला नाही.