वाशिम जिल्ह्यात १४ जण पाॅझिटिव्ह; २ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 03:52 PM2020-11-11T15:52:02+5:302020-11-11T15:52:15+5:30
CoronaVirus Washim : आणखी १४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर २ जणांनी कोरोनावर मात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरत असून, मंगळवारी आणखी १४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर २ जणांनी कोरोनावर मात केली. आता एकूण कोरोनाबाधितांचा संख्या ५८०५ वर पोहचली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत आणखी घट येत असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर महिन्यात मृत्यूसत्रालाही ब्रेक लागल्याचे तुर्तास दिसून येते. मंगळवारीदेखील कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. दरम्यान, मंगळवारी १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील देवपेठ येथे १, सुपखेला येथे १, मंगरूळपीर तालुक्यातील वरुड येथे १, मालेगाव शहरातील २, इराळा येथील १, भेरा येथील ७, मानोरा तालुक्यातील कुपटा येथील १ अशा १४ जणांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात २ जणांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८०५ वर पोहचला आहे. आतापर्यंत ५४९१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान कोरोनाबाधितांची आकडा घसरल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोरोनाचा आलेख घसरत असला तरी संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.