मंगरूळपीरमधील सर्वसाधारणसाठीची १४ गावे नामाप्रसाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:09+5:302021-02-05T09:21:09+5:30

मंगरूळपीर : तालुक्यातील मुदत संपून निवडणूक पार पडलेल्या ग्रामपंचायतीसाठी ७ डिसेंबर २०२० रोजी जाहीर आरक्षणानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असलेली ...

14 villages in Mangrulpeer are reserved for the general public | मंगरूळपीरमधील सर्वसाधारणसाठीची १४ गावे नामाप्रसाठी आरक्षित

मंगरूळपीरमधील सर्वसाधारणसाठीची १४ गावे नामाप्रसाठी आरक्षित

googlenewsNext

मंगरूळपीर : तालुक्यातील मुदत संपून निवडणूक पार पडलेल्या ग्रामपंचायतीसाठी ७ डिसेंबर २०२० रोजी जाहीर आरक्षणानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असलेली १४ गावे २ फेब्रुवारी रोजीच्या आरक्षण सोडतीत नामाप्र प्रवर्गासाठी राखीव झाली. त्यामुळे या प्रवर्गातील सरपंच पदासाठी इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला, तर नव्यांना संधी उपलब्ध झाली.

यापूर्वी ७ डिसेंबर रोजी जाहीर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत मंगरूळपीर तालुक्यातील ३४ गावे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होती; परंतु २ फेब्रुवारी रोजीच्या आरक्षणात यामधील पिंपळखुटा, ईचा, कंझरा, पारवा, तपोवन, नांदखेडा, शेगी, पिंपळगाव व लाठी आदींसह १४ गावे नामाप्र प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. त्यामुळे इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला असून, काही ठिकाणी सरपंच पदात फेरबदल होणार आहेत. असे असले तरी अद्याप महिला आरक्षण जाहीर करण्यात आले नसून ४ जानेवारी रोजी याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: 14 villages in Mangrulpeer are reserved for the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.