विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:42 AM2017-10-16T01:42:47+5:302017-10-16T01:44:05+5:30
कामरगाव: विहिरीवरील मोटरपंपाच्या प्लगमध्ये वायर टाकत असताना विजेचा धक्का लागल्याने स्थानिक रेणुकानगरमधील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव: विहिरीवरील मोटरपंपाच्या प्लगमध्ये वायर टाकत असताना विजेचा धक्का लागल्याने स्थानिक रेणुकानगरमधील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास येथे ही घटना घडली. तन्मय दिनेश कावरे असे मृतक मुलाचे नाव आहे.
तन्मय हा शनिवारी विहिरीवरील मोटरपंप सुरू करण्यासाठी टाऊन भागात गेला होता. या मोटरपंपाच्या प्लगमध्ये वायर टाक त असताना अचानक त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.
नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तत्काळ स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; पण डॉ क्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी धनज बु. पोलिसांनी प्रवीण कावरे (कामरगाव) यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृ त्यूची नोंद केली.