वाशिम जिल्ह्यात १४ हजारांवर नव्या मतदारांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 04:56 PM2018-09-28T16:56:19+5:302018-09-28T16:56:46+5:30

२८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १४०७९ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर ९७७८ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. 

14,000 new voters in Washim district | वाशिम जिल्ह्यात १४ हजारांवर नव्या मतदारांची नोंद

वाशिम जिल्ह्यात १४ हजारांवर नव्या मतदारांची नोंद

Next

विशेष संक्षीप्त पुनरिक्षण : जिल्हाभरात मोहिम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पुढील वर्षी होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १४०७९ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर ९७७८ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. 
जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत १ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली. तर १ सप्टेंबरपासून दावे व हरकती स्विकारण्यात येत आहेत. ही मोहिम ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत चालेल, त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून, ३ जानेवारीपूर्वी डाटाबेस अद्ययावतीकरण करून पुरवणी यादीची छपाई करण्यासह ४ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण १०४३ मतदान केंद्र असून, प्रत्ये मतदान केंद्रांवर बीएलओची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिपाई, अंगणवाडीसेविका, नगर परिषद कर्मचारी व शिक्षकांचा समावेश आहे. या मोहिमेंतर्गत नव मतदारांची नोंदणी करण्यासह मयत मतदारांची नावे वगळणे आणि स्थलांतरीत मतदारांची दुरुस्तीही करण्यात येत आहे. यात जिल्हाभरात २८ सप्टेंबरपर्यंत १४ हजार ७९ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर ९७७८ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. 

नवीन कंट्रोल व बॅलेट युनिट प्राप्त
आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर जिल्हा निवडणूक विभागास नवीन १३४८ कंट्रोल युनिट, २३१८ बॅलेट युनिट प्राप्त झाले असून, लवकरच व्हीव्हीपॅट मशीनदेखील प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी दिली. 
 
 ४६१० दिव्यांग मतदारांची नोंदणी 
शासन निर्देशानुसार दिव्यांग मतदारांच्या विशेष नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरदरम्यानच्या कालावधीत ४६१० दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. ही मोहिम ३० आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे.

Web Title: 14,000 new voters in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम