लाखाळा येथे १५ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:58+5:302021-05-08T04:42:58+5:30
वाशिम शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही, सकाळी ९ ते ११ या वेळेत बाजारपेठेत गर्दी होत आहे. दरम्यान, लाखाळा ...
वाशिम शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही, सकाळी ९ ते ११ या वेळेत बाजारपेठेत गर्दी होत आहे. दरम्यान, लाखाळा परिसर, सिव्हिल लाईन, आययूडीपी कॉलनी परिसरात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिक सावध झाले आहेत. गुरुवारी सिव्हिल लाइन भागात ११, लाखाळा भागात १५, आययूडीपी ४ असे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील इतर रुग्णांची माहिती संकलित केली जात असून, संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहविलगीकरणात तर तीव्र लक्षणे असणारे रुग्ण खासगी व सरकारी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी शहरात कुठेही गर्दी करू नये, मास्कचा नियमित वापर करावा, हात वारंवार धुवावे, असे आवाहन नगर परिषद, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने केले.