मालेगावच्या स्वामी सर्मथ मंदिरात १५ हजारांची चोरी
By admin | Published: February 4, 2017 01:43 AM2017-02-04T01:43:00+5:302017-02-04T01:43:00+5:30
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.
Next
मालेगाव, दि. 0३- मालेगाव शहरातील श्री स्वामी सर्मथ मंदिरात २ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला.
मंदिराचे चॅनल गेट तोडून चोरट्यांनी मंदिराचे व नंतर दानपेटिचे कुलुप तोडले. त्यामधून चांदीच्या पादुका व दानपेटितील १0 हजार असा ऐवज लंपास केला. याबाबत लक्ष्मण उकंडा राऊत यांनी मालेगाव पोलीसात फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.