वाशिम जिल्हा कारागृहातील १५० कैद्यांची दहा महिन्यांपासून नातेवाईकांशी भेटगाठ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 12:30 PM2021-02-07T12:30:51+5:302021-02-07T12:31:08+5:30

Washim Central Jail कारागृहात बंदिस्त असलेले १५० कैदी गेल्या १० महिन्यांपासून नातेवाईकांच्या भेटीला आसूसले आहेत.

150 inmates of Washim district jail have not met their relatives for ten months! | वाशिम जिल्हा कारागृहातील १५० कैद्यांची दहा महिन्यांपासून नातेवाईकांशी भेटगाठ नाही!

वाशिम जिल्हा कारागृहातील १५० कैद्यांची दहा महिन्यांपासून नातेवाईकांशी भेटगाठ नाही!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमिवर जिल्हा कारागृहातील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांची भेट नाकारण्यात आलेली आहे. दरम्यान, वाशिम येथील कारागृहात बंदिस्त असलेले १५० कैदी गेल्या १० महिन्यांपासून नातेवाईकांच्या भेटीला आसूसले आहेत. कारागृह प्रशासनाने त्यांना मोबाईल व व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने विविध घटकांवर परिणाम केला आहे. मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढायला लागला. यावेळी खबरदारी म्हणून शासनाने सक्तीचे लॉकडाऊन लागू करण्यासोबतच जिल्हा कारागृहातील कैद्यांना संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी नातेवाईकांची भेट घेण्यावर निर्बंध आणले.  


कधी मोबाईल फोन; तर कधी व्हिडीओ कॉल!
जिल्हा कारागृह प्रशासनाने नातेवाईकांसोबत बोलण्याकरिता कैद्यांना मोबाईल फोन किंवा व्हिडीओ कॉल करण्यास परवानगी दिलेली आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू असल्याने किमान तोपर्यंत तरी कैद्यांना नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही, अशी स्थिती आहे.


जैन संस्थानतर्फे उबदार कपड्यांचे वाटप
जैनांची काशी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानकडून जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना २०० ब्लँकेट देण्यात आली आहेत. याशिवाय जुने ब्लँकेटही उपलब्ध असल्याने थंडीच्या दिवसात कैद्यांची सोय झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून शासनाने जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना नातेवाईकांची भेट घेण्यावर निर्बंध घातले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू असल्याने किमान तोपर्यंत तरी कैद्यांना नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही; मात्र त्यांना मोबाईल फोन व व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- सोमनाथ पाडूळे
जिल्हा कारागृह अधीक्षक, वाशिम

Web Title: 150 inmates of Washim district jail have not met their relatives for ten months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.