१५३ नमुने आढळले दूषित; पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:08+5:302021-07-14T04:46:08+5:30
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासह भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थने पाणी नमुने दूषित आढळलेल्या गावांतील जलस्रोत शुद्धिकरण ...
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासह भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थने पाणी नमुने दूषित आढळलेल्या गावांतील जलस्रोत शुद्धिकरण करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. क्लोरिनेशन आणि क्लोरिनवॉश ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य उपकेंद्रांतर्गत तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी साथरोग औषधी किट ठेवण्याच्या योजनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत. शिवाय, जोखीमग्रस्त नदीकाठच्या गावांत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित सर्वेक्षणाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुढील पंधरा दिवस क्लोरिनेशन आणि क्लोरिनवॉक विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
---
तालुकानिहाय नमुने
-----
वाशिम -
नमुने घेतले-१३५
दूषित नमुने- ३९
--------
मालेगाव
नमुने घेतले- ११०
दूषित नमुने-१४
------------
रिसोड -
नमुने घेतले- १२९
दूषित नमुने-१७
---------
मानोरा-
नमुने घेतले- १०१
नमुने दूषित - २७
-----------
मंगरूळपीर-
नमुने घेतले- १०१
नमुने दूषित - २८
------------------
कारंजा
नमुने घेतले- १०१
नमुने दूषित - २८
-----------------
ज्या गावांत तपासणीच झाली नाही त्यांचे काय?
१) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून जलस्त्रोतांतील पाण्याची योग्य तपासण्यासाठी नमुन्यांचे संकलन केले जाते. यासाठी संबंधित यंत्रणेला नमुने घेण्याच्या सूचनाही केल्या जातात
२) वाशिम येथील जिल्हा प्रयोगशाळेसह मालेगाव आणि मानोरा येथील उपविभागीय प्रयोगशाळेकडून यंदाही १ जुलै ते ९ जुलैदरम्यान पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६७७ नमुने तपासण्यात आले.
३) अनेक गावांतून नमुनेच प्राप्त झाले नाहीत. त्या गावांना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची माहिती देण्यात येत असून, या गावांत जलसुरक्षक, ग्रामसेवक, महिला बचतगटाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
------------------------
कोरोनामुळे नमुने घटले
१) गत वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम आहे. याचा विविध क्षेत्रावर परिणाम झाला असून, ग्रामीण भागांतही त्याचे पडसाद दिसून येत आहेत.
२) स्थानिक स्वराज्य संस्था तसेच ग्रामीण भागांतील विविध यंत्रणांच्या कामावर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेच पावसाळ्याच्या दिवसांत तपासणीसाठी नमुन्यांच्या संकलनावरही परिणाम झाला.
३) गतवर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पाणी नमुन्यांचे संकलन करणे कठीण झाले. या काळात जिल्ह्यातून पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळांना प्राप्तच झाले नाहीत.
---
शहरी भागांत दहा ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य
१) १८०- ठिकाणचे नमुने घेतले
२) १०- नमुने दूषित आढळले
३) १७०- नमुने चांगले आढळले
-------------
१) शहरी भागांत नगर परिषद, नगर पंचायतींच्या पाणीपुरवठा विभागाकडून नमुन्यांचे संकलन करण्यात आले.
२) सहा तालुक्यातून १८० नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले होेते. त्यापैकी १७० नमुने चांगले, तर १० नमुने दूषित आढळले.
----------------
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या
१) पावसाळ्यात जलजन्य आजार उद्भवतात. उलटी, जुलाब असे आजार होतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
२) आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यातील दूषितपणा नाहीसा होतो.
३) खाद्यपदार्थ उघडे ठेवू नयेत. माशा बसून आजार होऊ शकतात. शिवाय, शिळे अन्नही खाऊ नये. ताजे गरम अन्न खावे.
४) जीएसडीए लॅबमध्ये १६७५ नमुने तपासण्यात आले. त्यात २८६ नमुने दूषित आढळले, तर जिल्हा लॅबमध्ये १६९९ पैकी १९४ नमुने दूषित आढळले आहेत.