ग्रामपंचायत निवडणूकीत १५५ सदस्य अविरोध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:43 PM2017-10-04T19:43:26+5:302017-10-04T19:44:08+5:30
मालेगाव (वाशिम): तालुक्यात ७ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पुर्वीच आपसी सहमतीने १५५ सदस्य आणि २ सरपंचांची अविरोध निवड झाली. यामुळे निवडणूकीचा अवाजवी खर्च आणि प्रशासनावर ओढवणारा ताण आपसूकच कमी झाला.
Next
ठळक मुद्दे२ सरपंचांची अविरोध निवड निवडणूकीचा अवाजवी खर्च आणि प्रशासनावर ओढवणारा ताण कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): तालुक्यात ७ आॅक्टोबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पुर्वीच आपसी सहमतीने १५५ सदस्य आणि २ सरपंचांची अविरोध निवड झाली. यामुळे निवडणूकीचा अवाजवी खर्च आणि प्रशासनावर ओढवणारा ताण आपसूकच कमी झाला.
मालेगाव तालुक्यात यंदा ४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून प्रथमच सरपंचपद थेट जनतेतून निवडल्या जाणार असल्याने निवडणूकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, निवडणूकीच्या प्रचाराला सर्वत्र वेग आला असताना १५५ सदस्य आणि २ सरपंचांची अविरोध निवड करून तालुक्याने समाजासमोर आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.