१५६० घरकुल लाभार्थिंना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:42 AM2021-02-11T04:42:21+5:302021-02-11T04:42:21+5:30

ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र लाभार्थिंना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) राबविण्यात येते. घरकुल बांधकामासाठी लाभार्थिंना तीन ...

1560 Gharkul beneficiaries await second installment of grant | १५६० घरकुल लाभार्थिंना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

१५६० घरकुल लाभार्थिंना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

Next

ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र लाभार्थिंना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) राबविण्यात येते. घरकुल बांधकामासाठी लाभार्थिंना तीन हप्त्यांमध्ये १.२० लाख रुपये दिले जातात. सन २०१९-२० या वर्षात जिल्हयात १४०७ तर सन २०२०-२१ या वर्षात जिल्हयात २०३३ घरकुलांना मंजुरी मिळाली. २०१९-२० मध्ये १३२३ लाभार्थिंना अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला तर ८४ जणांना पहिला हप्ताही मिळाला नाही. २०२०-२१ मध्ये ४७३ लाभार्थिंना पहिला हप्ता मिळाला तर १५६० जणांना पहिला हप्ता मिळाला नाही. अनेकांना पहिला हप्ता दिल्यानंतर पुढचे पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे पडके घर तोडून पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. पुढील हप्त्याचे पैसे मिळाले नसल्याने घराचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या लाभार्थिंना गैरसोयींना सामाेरे जावे लागत आहे.

००००००००००००००

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) घर बांधकामासाठी १.२० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. तीन टप्प्यांत अनुदानाचे पैसे संबंधित लाभार्थिंच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात २०३३ घरे मंजूर असून, ४७३ लाभार्थिंना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला.

- डाॅ. विनोद वानखडे,

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

००००००

जिल्ह्यातील पीएम आवास योजनेची आकडेवारी (२०२०-२१)

किती लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झाले

२०२२

किती लोकांना पहिला हप्ता मिळाला. ४७३

किती लोकांना पुढील हप्ता मिळणे अद्याप बाकी आहे. १५६०

००००

तीन वर्षांत मंजूर झालेल्या घरकुलांची आकडेवारी

२०१६-१७ ३७०५

००

२०१७-१८ १०२२

०००

२०१९-२० १४०७

०००

घरकुल योजनेंतर्गत अनुदानाचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम केले. अनुदानाचे उर्वरित हप्ते मिळाले तर घरकुलाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करता येईल. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे.

-राजेंद्र वानखडे,

घरकुल लाभार्थी.

०००

शासनाच्या विविध योजनांतून पात्र लाभार्थिंना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. ही बाब अतिशय चांगली आहे. परंतु, अनुदान वेळेवर व नियमित मिळत नसल्याने लाभार्थिंना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात चकरा मारूनही लवकर न्याय मिळत नाही. अनुदान लवकर मिळाले तर घरकुलाचे बांधकामही वेळेवर होऊ शकते.

- सीताराम पवार,

घरकुल लाभार्थी.

०००

डोक्यावरील छप्पर गेल्याने हाल

पक्के घर बांधकामासाठी अनुदान मिळणार असल्याने संबंधित लाभार्थिंनी जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम सुरू केले. मध्यंतरी शासनाकडून अनुदानाची रक्कम मिळण्यास विलंब झाला. अनुदानाचा दुसरा हप्ता अनेकांना मिळाला नसल्याने राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जुने घर पाडल्याने आणि नवीन घर अर्धवट असल्याने अनेकांवर झोपडीवजा घरात राहण्याची वेळ आली आहे.

Web Title: 1560 Gharkul beneficiaries await second installment of grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.