१६0 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित!

By admin | Published: August 15, 2016 02:18 AM2016-08-15T02:18:27+5:302016-08-15T02:18:27+5:30

वाशिम जिल्ह्यात १६0.२३ किलोमीटर लांबीचे १९ रस्ते प्रस्तावित करण्यात आले.

160 kilometers of roads proposed! | १६0 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित!

१६0 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित!

Next

वाशिम, दि १४ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर आखण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात तयार करण्यात येणार्‍या रस्त्यांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. याअंतर्गत २0१६-१७ या आर्थिक वर्षात १६0 किलोमीटर अंतराचे रस्ते तयार करण्याची बाब प्रस्तावित असल्याची माहिती कार्यकारी अभियंता व्ही.डब्ल्यू. घनोकार यांनी दिली.
या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सन २0१५-१६ मध्ये ६३.९५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यातील रस्त्यांची कामे बहुतांशी पूर्ण झाली असून, सन २0१६-१७ मध्ये याच माध्यमातून १६0.२३ किलोमीटर लांबीचे १९ रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत, या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होताच कामे सुरू करणार असल्याची माहिती घनोकार यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.

Web Title: 160 kilometers of roads proposed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.