पशुसंवर्धन विभागातील १७ अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:51+5:302021-03-16T04:41:51+5:30
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात श्रेणी १ चे १७ आणि श्रेणी २ चे ४१ असे एकूण ५८ दवाखाने ...
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात श्रेणी १ चे १७ आणि श्रेणी २ चे ४१ असे एकूण ५८ दवाखाने आहेत. गुरांची संख्या २ लाख २२ हजार आहेत. तसेच शेळी, मेंढ्यांची संख्या १ लाख ४३ हजार आहेत. दरम्यान, श्रेणी-१ च्या दवाखान्यांमध्ये पशुधन विकास अधिकाऱ्यांची २१ पदे मंजूर असून ११ पदे भरण्यात आलेली आहेत. त्यातील ७ जण सध्या कोरोना बाधीत आहेत. श्रेणी-२ च्या दवाखान्यांमध्ये पशुधन पर्यवेक्षकांची ४९ पदे मंजूर असून ४० भरण्यात आलेली आहेत. त्यातील ५ जणांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाली; तर ६५ पैकी चार परिचरही कोरोनाने बाधीत आहेत. असे असताना शासनाने अन्य विभागांप्रमाणे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत विमा संरक्षण लागू केलेले नाही. यामुळे त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.
...........
कोट :
पशुसंवर्धन विभागांतर्गत ५८ दवाखान्यांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी १७ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. एका पशुधन विकास अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली असून त्याचा कामकाजावर बहुतांशी परिणाम होत आहे.
- व्ही. एन. वानखडे
पशुसंवर्धन अधिकारी, जि. प., वाशिम