चार महिन्यांत पाण्याचे १७१ नमुने आढळले दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:31+5:302021-07-14T04:46:31+5:30
पावसाच्या पाण्याचे योग्यरित्या संकलन व्हावे तसेच पाण्याची गुणवत्ता कायम राहावी, या मूळ उद्देशातून शासनाने ‘कॅच द रेन’ अभियान हाती ...
पावसाच्या पाण्याचे योग्यरित्या संकलन व्हावे तसेच पाण्याची गुणवत्ता कायम राहावी, या मूळ उद्देशातून शासनाने ‘कॅच द रेन’ अभियान हाती घेतले. याअंतर्गत १ मार्च २०२१ पासून पाणी नमुने तपासणी प्रक्रियेस गती देण्यात आली आहे. दरम्यान, ९ जुलैअखेर वाशिमच्या प्रयोगशाळेस रासायनिकचे १३५ नमुने प्राप्त झाले होते. त्यातील ३९ नमुने दूषित आढळले. मालेगावच्या प्रयोगशाळेत तपासल्या गेलेल्या २३९ नमुन्यांपैकी ३१; तर मानोरा प्रयोगशाळेला प्राप्त ३०३ नमुन्यांपैकी ८३ नमुने ‘अनफिट’ ठरले. यासह मालेगावच्या प्रयोगशाळेस प्राप्त २३६ जैविक नमुन्यांपैकी ६ आणि मानोरा प्रयोगशाळेला प्राप्त ११० नमुन्यांपैकी १२ असे १८ नमुने दूषित आढळल्याची माहिती कडू यांनी दिली.
......................
वेबिनारच्या माध्यमातून जनजागृतीवर भर
भूजल सर्वेक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील, ग्रामसेवक, जलसुरक्षा शेतकरी, विविध शाखांचे विद्यार्थी व महिला बचत गटाच्या सदस्यांमध्ये भूजलाबद्दल तसेच पाण्याची गुणवत्ता राखण्यासंबंधी वेबिनारच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
................
जिल्ह्यातील वाशिम येथील जिल्हा प्रयोगशाळा, मालेगाव व मानोरा येथील उपविभागीय प्रयोगशाळेत चार महिन्यांत १०२३ पाणी नमुने तपासण्यासाठी आले. त्यातील ८५२ नमुने पिण्यायोग्य; तर १७१ नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळले आहेत.
- सुनील कडू
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, वाशिम