स्मशानभूमी परिसरात १७५ रोपांची लागवड !

By admin | Published: July 6, 2017 02:32 PM2017-07-06T14:32:07+5:302017-07-06T14:32:07+5:30

एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची ही पहिलीच वेळ ठरली.

175 planting seedlings in the graveyard area! | स्मशानभूमी परिसरात १७५ रोपांची लागवड !

स्मशानभूमी परिसरात १७५ रोपांची लागवड !

Next

मेडशी (वाशिम) : वनमहोत्सवानिमित्त वनविभागाच्यावतीने मुस्लीम बांधवांच्या स्वयंस्फुर्तीने येथील मुस्लीम कब्रस्तानमध्ये ५ जुलै रोजी १७५ रोपांची लागवड करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची ही पहिलीच वेळ ठरली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशीक एन.आर.राऊत यांनी यासाठी पुढाकार घेतला. मेडशी येथील मुस्लीम कब्रस्तानमध्ये वनविभागाच्यावतीने प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी एन.आर.राऊत यांनी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले तसेच मुस्लीम बांधवाच्या स्वयंमस्फुर्तीने १७५ विविध जातीच्या रोपांची लागवड केली. यावेळी माजी उपसरपंच शेख रज्जाकभाई, सदर मो.अनिस, सचिव शेख रफीक, महेबुब गवरे, मदार मौलाना, शेख अमिरभाई, धन्नु भवानीवाले, अ.रज्जाक , शे.कय्युम बागवान, हाफीज सहाब, शे.आसिफ बागवान, इरफान भवानीवाले, कालुभाई गवरे, जावेद खान, मो.मजहर, लल्लुभाई गवरे, शे.आतीक, नवाजखान, शे.इलु, कालु रेघीवाले, वनरक्षक एफ. जी.माळीकर,एस.टी.कुटे, के.आर.मुंढे, पोफलवार, बुंदे, लहामगे,  गजानन शेंडे आदिंची उपस्थिती होती. ७ जुलैपर्यंत वनविभागाच्यावतीने वनपरिक्षेत्रांतर्गत २७ हजार ७७५ एवढी रोपे लावण्याचे उद्दिष्टे असून ५ जुलैपर्यत २० हजारावर रोपे लावण्याचे काम झाले आहे. 

Web Title: 175 planting seedlings in the graveyard area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.