१७९ शिक्षकांची पदस्थापना; २९ शिक्षकांची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 08:03 PM2017-08-22T20:03:39+5:302017-08-22T20:04:15+5:30

वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरलेल्या एकूण २०८ पैकी १७९ प्राथमिक शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली असून तर अद्याप २९ शिक्षकांची प्रतीक्षा कायम आहे. 

179 Posting of teachers; 29 teachers waiting! | १७९ शिक्षकांची पदस्थापना; २९ शिक्षकांची प्रतीक्षा !

१७९ शिक्षकांची पदस्थापना; २९ शिक्षकांची प्रतीक्षा !

Next
ठळक मुद्देआंतरजिल्हा बदली प्रक्रियागत काही वर्षांपासून रखडली होती शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरलेल्या एकूण २०८ पैकी १७९ प्राथमिक शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली असून तर अद्याप २९ शिक्षकांची प्रतीक्षा कायम आहे. 
गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडली होती. आंतरजिल्हा बदली नसल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले होते. पती-पत्नी एकत्रिकरणही रखडले होते. यावर्षी शासनाने हा प्रश्न निकाली काढला असून, आॅनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत अन्य जिल्ह्यातील २०८ प्राथमिक शिक्षक हे वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरले तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७४ शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलून गेले. 
२०८ शिक्षकांपैकी सुरूवातीला १४७ शिक्षक शिक्षण विभागात रूजू झाले होते. समुपदेशन पद्धतीने या १४७ शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळेतील रिक्त जागांवर समायोजन करण्यात आले होते. त्यानंतर ३२ शिक्षक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रूजू झाल्याने त्यांचेही समूपदेशन पद्धतीने समायोजन केले. उर्वरीत शिक्षकांपैकी आता तीन शिक्षक चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रूजू झाले आहेत. या शिक्षकांना लवकरच पदस्थापना दिली जाणार आहे. उर्वरीत २६ शिक्षकांना त्यांच्या मूळ जागेवरून (अन्य जिल्ह्यातून) कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे ते वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रूजू होऊ शकले नाहीत. समुपदेशन पद्धतीने समायोजन व पदस्थापना झालेल्या शिक्षकांना तातडीने नियुक्त शाळेवर रूजू व्हावे लागणार आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही जे रूजू होणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिली.

Web Title: 179 Posting of teachers; 29 teachers waiting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.