पालिकेच्या १८ गाड्या निघणार भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:54 AM2021-02-27T04:54:50+5:302021-02-27T04:54:50+5:30

वाहनांमुळे वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. १५ वर्षांहून अधिक जुन्या गाड्या भंगारात काढण्याची नीती लवकरच ...

18 BMC vehicles will be scrapped | पालिकेच्या १८ गाड्या निघणार भंगारात

पालिकेच्या १८ गाड्या निघणार भंगारात

Next

वाहनांमुळे वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. १५ वर्षांहून अधिक जुन्या गाड्या भंगारात काढण्याची नीती लवकरच अधिसूचित केली जाणार असून, १ एप्रिलपासून जुनी वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्क्रॅपेज पाॅलिसीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, नगरपालिकेतील किती गाड्या स्क्रॅप हाेत आहेत, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आराेग्य, स्वच्छता व अग्निशमन विभागातील १८ गाड्यांचा यामध्ये समावेश राहणार आहे. वाशिम नगरपालिकमध्ये २५ ते ३० वर्षांपूर्वीच्या ३ गाड्या असून, त्या आधीच भंगारात पडलेल्या आहेत. २० ते २५ वर्षांपूर्वीच्या २ गाड्या असून, १५ ते २० वर्षे अगाेदरच्या ११ गाड्या आहेत. यामधील काही नादुरुस्त तर काही चालू आहेत. यामुळे या सर्वच १६ ही गाड्या भंगारात जाणार आहेत. नगरपरिषदेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या विकत घेतल्या जातात, परंतु वाशिम नगरपरिषदेने या संदर्भात कंत्राट दिले असल्याने घंटागाड्या नगरपरिषदेकडे नाहीत. अग्निशमन विभागात १९९५, २००५ मधील दाेन जुन्या गाड्या आहेत, ज्यांना १५ वर्षे झालीत. केवळ एकच गाडी २०१३ मधील आहे, जी स्क्रॅप हाेणार नसल्याचे दिसून येते.

..............

०१ गाडीला ग्रीन टॅक्स

वाशिम नगरपरिषदेतील आराेग्य व अग्निशमन विभागातील १५ वर्षांपूर्वीच्या गाड्या भंगारात जाणार असल्याची माहिती घेतली असता, यामध्ये १८ गाड्यांचा समावेश आहे. नगरपालिकेत २५ वर्षांपूर्वीच्या, तसेच १५ वर्षांपूर्वीच्या गाड्या आहेत. केवळ अग्निशमन विभागात २०१३ मध्ये घेतलेल्या एकाच वाहनाला ग्रीन टॅक्स लागू आहे. हा ग्रीन टॅक्स ३,३०० रुपये लागू असून, हा नियमित भरला नसल्यास २ टक्के अतिरिक्त भरावे लागणार आहे.

.........

केंद्र सरकारने १५ वर्षांवरील गाड्या स्क्रॅप करण्याची माहिती आहे. त्यानुसार, नगरपरिषदेतील गाड्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन केले जाईल.

- दीपक माेरे

मुख्याधिकारी, नगरपरिषद, वाशिम

..........

वाशिम नगरपरिषदेच्या नादुरुस्त असलेल्या अनेक गाड्या अग्निशमन विभागाच्या खुल्या परिसरात ठेवल्या आहेत.

Web Title: 18 BMC vehicles will be scrapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.